महिला व सोशियल मेडिया अन पुरुषांची मानसिकता..

महिला व सोशियल मेडिया..
पुरुषांची नाहक काळजी व प्रश्नवाचक दृष्टी..
यातुन महिलांना होत असलेला मानसिक त्रास व यामुळ सोशियल मेडियावर महिलांची कमी होत असलेली संख्या हि चिंताजनक बाब आहे..

सोशियल मेडियावर महिलांचा वावर चांगला आहे व त्यांच हे असणं व वावरण स्वागताहार्यच बाब आहे.. कितीतरी महिला छान छान व नवनवीन विचार मांडतात, कथा लिहतात, कविता करतात, शायरी करतात, राजकीय मते मांडतात, समाजकार्य करतात, चळवळी चालवतात, संघर्ष मांडतात, मैत्रीचे संदेश देतात, छान छान सुंदर पिक्स टाकतात, स्वानुभव व इतरांचे अनुभव व कधी कधी एखाद्याचा मुर्खुपणा ओपनली सांगुन व शेअर करुन फेसबुकला परिपुर्ण करतात..

पण काही अतिहुशार पुरुषमंडळींना महिलांचे विचार, कविता, कथा, राजकारण, अनुभव व इतरही समाजोपयोगी बाबीत इंटरेस्ट नसतो तर हि जरा जास्तच फोटो टाकु लागलीय हि अस का करत असेल ? हिचा एकही फोटो फेसबुकला नाही अस का लपवत असाव स्वत:ला ? हिन बर्थ ईयर लपवलय किती वय असाव हिच ? एवढा वेळ फेसबुकला व सोशियल मिडीयाला अॅक्टीव्ह राहते तर मग हिला काही काम नसल का ? हिच नव-याशी जमत नसेल का ? हिला बाॅयफ्रेंड असेल का ? हिचा अन बाॅयफ्रेंडचा ब्रेकप झाला असेल का ? मुलबाळ असतील का ? असतील तर मग हि मुलांना कस वेळ देत असेल ? वगैरे वगैरे वगैरे या बाबतीतच जास्त इंटरेस्ट असतो व मग महिलांच्या अकाऊंटकड व पोष्टकड याच प्रश्नांच्या चष्म्यातुन व जेम्स बाँड होवुन पाहिल जात..

एखादी महिला जर रात्री आॅनलाईन दिसली की मग तर या मंडळीच्या डोक्यात काहुर माजत व काही महाभाग उगीच हाय हॅल्लो व काहीबाही चॅट मेसेंजरला टाकत बसतात.. आपण पाहिलय या वरील बाबतीत व चॅट मेसेंजरली होत असलेल्या डिस्टर्ब बाबीत कितीतरी महिलांनी याबाबत तक्रारवजा ओपन पोष्ट केल्यात, फेसबुकला स्टेटस तसे ठेवलेत व यावर त्यांचे परखड मत मांडलयही..

मला त्या प्रश्नवाचक, दुस-याच्या जीवनात डोकावु ईच्छीना-या, जेम्स बाँड टाईप व दुस-याच्या जीवनात नाक खुपसना-या तमाम मंडळींना सांगावस वाटत की जशी तुमची लाईफ तुमची आहे ना ? तशीच त्यांचीही लाईफ त्यांचीच आहे.. तुम्ही जगा अन त्यांनाही जगु द्या जी.. तुम्ही तुमच बघा कारण त्या सक्षम आहेत व त्यांना सर्वकाही कळतय तुम्ही उगीच सगळ्या जगाची चिंता करत बसु नका जी..

मित्रहो तुम्ही जगा इतरांनाही जगु द्या..
तुम्ही तुमच बघा त्यांना त्यांच बघु द्या..

3 thoughts on “महिला व सोशियल मेडिया अन पुरुषांची मानसिकता..

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s